मुंबई : इंग्रज सैनिकांची सोय म्हणून ब्रिटिशांनी वसवलेला मुंबईतील कामाठीपुरा हा देशातील दुसरा मोठा रेड लाइट एरिआ आजही तितकाच भयाण आहे. वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या अनेक महिला येथे नरकयातना भोगत आहेत. १९८० साली अमेरिकी फोटोग्राफर मेरी एलेन मार्क यांनी त्यांच्या कॅमेऱ्याद्वारे येथील स्थिती जगासमोर आणली होती.
मेरी यांनी या फोटोंच्या संग्रहाला द केज गर्ल्स ऑफ बॉम्बे असे नाव दिलेले. तीन महिने कामाठीपुरामध्ये राहून त्यांनी वेश्यांना होणारे आजार, त्यांच्यावरील अत्याचार आणि दारिद्र्य त्यांच्या कॅमेऱ्यात साठवले होते. ही छायाचित्र जगभर गाजली होती.
८० च्या दशकात कामाठीपुरात मोठ्या प्रमाणात सेक्स वर्कर्स काम करायच्या. त्यात काही बार गर्ल्सपण होत्या. त्या वेळी देश –विदेशातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी येथे धाव घेत हा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळे आता परिस्थिती काहीशी पालटली आहे. अनेक जणींनी वेश्या व्यवसाय सोडून दिला आहे, तर अनेकींची मुले बाळे आज परदेशांत शिकत आहेत.
वाचा –
घर, दुकानांमधून जाते रेल्वेगाडी
पूर्वी हा अंडरवर्ल्डचा मोठा अड्डा होता. दाऊद इब्राहीम, छोटा राजन, विक्की गोस्वामी, यांच्यासोबतच अनेक अंडरवर्ल्ड डॉन येथे येत असायचे. त्यामुळे देहव्यापाराबरोबरच येथे अमली पदार्थ तस्करी आणि अन्य अवैध धंदेही चालत असतं. आज येथे मानवी तस्करीचा मोठा अड्डा आहे. बांगलादेश किंवा अन्य राज्यांतून येणाऱ्या महिलांना इथे नशेची सवय लावून खोल्यांमध्ये डांबून ठेवले जाते. तरुण दिसण्यासाठी इंजेक्शन,गोळ्या दिल्या जातात. एका रात्रीत एका मुलीला ५ ते ८ ग्राहकांकडे सोपवले जाते. सेक्स करण्यास विरोध केल्यास त्यांना मारहाण करून,त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जातात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.