HW News Marathi
देश / विदेश

इदनंतर गळाभेट घेणे टाळा

लखनऊ योगी आदित्य मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तरप्रदेशमध्ये दररोज नवेनवे आदेश जारी केले जात आहेत. या आदेशातून समाजात एकी निर्माण होण्याऐवजी दुफळी कशी वाढत असल्याचे दिसून आले. विशेषतः मुस्लीमांना विरोध दर्शवणे हा त्यामागचा हेतु असतो. परंतु यावेळी मात्र वेगळेच चित्र उत्तर प्रदेशात पाहावयास मिळाले आहे. इदची नमाज झाल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका, असा आदेश योगी सरकराने नव्हे तर एका मौलानानेच जारी केला आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य असलेले सुन्नी मौलाना रशीद फिरंगिमहली यांनी मुस्लिमांना हे आवाहन केले आहे. मात्र, यामागे कोणतेही धार्मिक कारण नसून राज्यात स्वाइन फ्लूचटा फैलाव वाढला असल्याने काळजीपोटी त्यांना हा सल्ला दिला आङे. दरम्यान शिया मौलाना जव्वाद यांनी गळाभेट घेताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशातील 75जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे 66 रुग्ण आढळले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

५ एकर जमिनीची भीक नको | असदुद्दीन ओवेसी

News Desk

बंद लिफाफ्यातून सुचविली जाणार नव्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीची नावे

News Desk

#Coronavirus : आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीमला ममता बॅनर्जींचा विरोध

News Desk
देश / विदेश

‘या’ कारणामुळे बॅंका ५ दिवस बंद राहणार

News Desk

मुंबई | साप्ताहिक सुट्ट्या, सार्वजनिक सुट्टी व कर्मचारी-अधिकाऱ्यांचा संप यामुळे सरकारी बँकांचे कामकाज (२१ डिसेंबर) आजपासून (सोमवारचा अपवाद वगळता) सलग ५ दिवस बंद राहणार असल्याची शक्यता आहे. आज अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाने प्रदीर्घ वेतन सुधार मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे. तर, २६ तारखेला बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना संपावर जाणार आहेत. यामुळे बँक व्यवहारांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाने आज संपाची हाक दिली आहे. यामुळे बँका बंद राहण्याची शक्यता नसली तरी त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार आहे. यानंतर २२, २३ डिसेंबरला अनुक्रमे चौथा शनिवार व रविवार असल्याने बँका बंद असतील. सोमवारी मात्र बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू राहील.

नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने २५ तारखेला पुन्हा बँका बंद राहतील. आघाडीच्या नऊ बँकांच्या कर्मचारी संघटनेची शीर्ष संघटना असणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने नाताळला जोडून बुधवारी (२६ डिसेंबर) संप पुकारल्याने कामकाजाला फटका बसेल. या संघटनेनेही वेतनासंबंधी मागण्या पुढे करून संपाची हाक दिली आहे.

बँकांकडून सूचना

या सलग सुट्ट्यांविषयी बहुतांश बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे. बँकांचे व्यवहार हे प्रत्यक्ष शाखांच्या बरोबरच एटीएम, मोबाइल अॅप, नेटबँकिंग आदी माध्यमांतूनही होत असल्याने ग्राहक सेवेवर फार परिणाम होणार नाही, असे बँकांचे म्हणणे आहे.

२१ डिसेंबर- संप

२२ आणि २३ डिसेंबर – शनिवार आणि रविवार

२५ डिसेंबर – नाताळची सुट्टी

२६ डिसेंबर – बँक कर्मचारी संघटनेचा संप

Related posts

 शशिकला समर्थक ई पलानीस्वामीच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

News Desk

भारत-पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द

swarit

ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘ऑपरेशन कमळ’चे सूत्रधार केले आहे – सामना अग्रलेख

News Desk