HW News Marathi
मुंबई

मोबाइल सावरताना आईने चिमुरडीला दहाव्या मजल्यावरून पाडले

मुंबई : सेल्फी आणि मोबाइलचे वेड जिवावर बेतण्याच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. मुंबई उपनगरातील एका मातेने मोबाइलच्या नादात पोटच्या मुलीला गमावले आहे.हातातून निसटणारा मोबाइल सावरताना धक्का लागूनतिची १८ महिन्यांची मुलगी दहाव्या मजल्यावरून पडली.

अंधेरी पूर्वेच्या डोंगरी परिसरातील रिहाब कनकिया इमारतीत हा प्रकार घडला. अनू यादव असे मृत मुलीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ७च्या सुमारास दहाव्या मजल्यावर अनूची आई आरती (२७) तिला खिडकीजवळ घेऊन उभी होती. हातातील मोबाइल पडत असल्याने तो सावरण्यासाठी आरती वाकली असता तिचा धक्का लागून अनू खाली कोसळली. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

पायलटच्या सतर्कतेला सलाम, घाटकोपरकरांचे वाचवले प्राण

News Desk

भुयारी मार्ग की, स्वीमिंग पूल…

swarit