नवी दिल्ली | “प्रियंकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हणालात म्हणून कोणीही दुर्योधन होत नाही. आता कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन ते २३ मे रोजीच कळेल”, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना अहंकारी दुर्योधनाची उपमा दिली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ते पश्चिम बंगालच्या प्रचारसभेत बोलत होते.
BJP President Amit Shah in Bishnupur, West Bengal: Priyanka Vadra just called PM Modi 'Duryodhana,' Priyanka ji this is democracy, nobody becomes 'Duryodhana' just because you called them so. We will find out on May 23 who is 'Duryodhana and who is 'Arjuna.' pic.twitter.com/S80553CW5d
— ANI (@ANI) May 7, 2019
“देशात लोकशाही आहे. प्रियंकाजी तुम्ही म्हणता म्हणून कोणीही दुर्योधन होणार नाही. कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे २३ मे रोजीच कळेल”, असे म्हणत अमित शहा यांनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरातून यावर टीकेची झोड उठली. याबाबत बोलताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना अहंकारी असे संबोधले. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्या या टीकेला अमित शहा यांनी आपल्या प्रचारसभेत प्रत्युत्तर दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.