HW News Marathi
महाराष्ट्र

११ हजार गणेशांपासून साकारला ‘महागणेश’

नाशिक – विविध वस्तुंपासून गणेश मूर्ती बनविण्याचे छंद अनेकांना असतात. अगदी टाकाऊपासून टिकावू गणेश मूर्तीही अनेक जण बनवतात. मात्र लहान गणेशमूर्तींपासूनच महाकाय गणेशमूर्ती बनविण्याची कल्पना साकारली आहे, नाशकातल्या एका अवलियाने!संजय क्षत्रिय असे या कल्पक कलकाराचे नाव असून त्यांनी तब्बल ११ हजार छोट्या गणेशमूर्तींपासून सुमारे १८फूट लांबीचा महागणपती साकारला आहे.

रंगकाम करणाऱ्या क्षत्रिय यांना शाडू मातीपासून छोट्या गणेशमूर्ती घडवण्याचा छंद आहे. क्षत्रिय यांनी वीस वर्षांमध्ये तीन इंच उंचीच्या तब्बल ३३ हजार गणेशमूर्तीघडवल्या. यापैकी ११ हजार गणेशमूर्तींचा त्यांनी महागणपती साकारण्यासाठी वापर केला. ११ हजार गणेशमूर्तींपासून घडवण्यात आलेला हा महागणपती पाहण्याकरीता लोकांची याठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन

Aprna

राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का?, भाजपचा सवाल   

News Desk

परमबीर सिंगांचे भाजप नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधींची राजकीय वर्तुळात चर्चा!

News Desk