HW News Marathi
देश / विदेश

रेल्वे करणार २ लाख कामगार भरती

नवी दिल्ली : रेल्वे अपघातांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ मनुष्यबळाअभावी होत असल्याचे समोर आल्याने रेल्वेने जम्बो कामगार भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेची गस्ती यंत्रणा आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी येत्या काही वर्षात रेल्वेत दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. रेल्वेच्या सुरक्षा विभागात सध्या १६ टक्के जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठीच भरती करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात उत्कल एक्सप्रेस नुकतीच रूळावरून घसरली होती. त्यानंतर रेल्वेच्या मेंटेनन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील त्रुटी दूर करण्यासाठी रेल्वेत १५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. गेल्या तीन वर्षाची रेल्वे अपघाताची आकडेवारी पाहता दरवर्षी सरासरी ११५ रेल्वे अपघात होतात. त्यामुळे आगामी काळात दुरूस्ती आणि सुरक्षा विभागात जास्तीत जास्त कामगार भरती करण्यात येणार असल्याचही या अधिकाऱ्याने सांगितलं. रेल्वे अपघात रोखण्यासाठी गँगमन आणि रेल्वेरूळाची पाहणी करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. रेल्वे रूळाची पाहणी करण्यासाठी १०० हून अधिक तपासणी वाहने खरेदी करण्याचा विचार आहे. शिवाय रेल्वे रूळाला तडे गेल्यास त्याची तात्काळ माहिती देणारी सेंसर टेक्नॉलॉजीही सुरू करण्यात येणार असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपकडून विधान परिषदेचे ‘४’ उमेदवार जाहीर, खडसे अन् पंकजा मुंडेंना मोठा धक्का

News Desk

दिलासादायक! भारतात कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझा पद्धती अवलंबणार

News Desk

पॉंडिचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत ठरले अपयशी

News Desk
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Related posts

सुषमा स्वराज खोटारड्या आहेत, चीनचा आरोप

News Desk

मद्रास न्यायालयाने ‘टिकटॉक अ‍ॅप’वरील बंदी उठवली

News Desk

उद्या बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय निकाल देणार, आरोपींना हजर राहण्याचे आदेश

News Desk