HW News Marathi
देश / विदेश

पुन्हा रेल्वे अपघातात, 74 गंभीर जखमी 

लखनौ-उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला असून एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले असून त्यात 74 प्रवाशी जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला. गेल्या आठवड्यात उत्कल एक्सप्रेसला अपघात होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने रेल्वेच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. येथील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

swarit

‘संजय राऊत,निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…’ भाजपचे नेते का खवळले ?

News Desk

महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल | जयंत पाटील

News Desk