HW News Marathi
देश / विदेश

ध्वजारोहण करून परतणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार

चंदीगड – शाळेत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना एका नराधमाने अकरा वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा प्रकार मंगळवारी येथे घडला आहे. सनदी अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकारही घडल्याने चंदीगडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सकाळी शाळेत गेलेली ही विद्यार्थीनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर घरी येत होती. ११ वाजताच्या सुमाराससेक्टर २३ मधील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कजवळील नाल्याजवळ तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हा नराधम आरोपी ४० वर्षांचा असल्याचे सांगण्यात येते. शॉर्ट कट म्हणून जंगल भागातून येत असताना या बालिकेवर हा प्रसंग गुदरला.

याप्रकरणी पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिच्याकडून बरीच माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे ४७ वे सरन्यायाधीश

News Desk

तीन तलाक विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी

News Desk

सुशांतच्या मृतदेहाचे फोटोज व्हायरल, महाराष्ट्र सायबर सेलचा कडक इशारा

News Desk