HW News Marathi
क्राइम

आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई | मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे. याचं कारण म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. आर्यन खानचा जवळचा मित्र अरबाज मर्चंटदेखील यावेळी उपस्थित होता. या सर्वांची सध्या एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

अरबाज मर्चंट हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जवळचा मित्र

समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण आठ जणांची चौकशी केली जात आहे. “आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा यांची क्रूझ पार्टी रेव्ह प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. अरबाज मर्चंट हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जवळचा मित्र आहे.

एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचे क्रूझवरील व्हिडीओ मिळवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओंमध्ये आर्यन खान सफेद टी-शर्ट, लाल शर्ट, निळी जीन्स आणि टोपीत दिसत आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाइल फोन जप्त केला असून त्यामधील चॅट्स आणि टेक्स्ट मेसेजेची तपासणी केली जात आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या इतरांचेही मोबाइल तपासले जात आहेत.

आयोजकांना चौकशीसाठी समन्स

एनसीबीने पार्टी आयोजकांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. एफटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक काशीफ खानदेखील रडारवर असून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ही पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आत्महत्येबाबत फेसबूकवर पोस्ट टाकणाऱ्या तरूणाचे वाचवले प्राण

News Desk

पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

News Desk

भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा आरोप, तर यावर सोमैय्या म्हणतात-

News Desk