HW News Marathi
देश / विदेश

‘ब्ल्यू व्हेल’च्या तावडीतून विद्यार्थ्याची सुटका

भोपाळ – ‘ब्लू व्हेल’चे व्हर्च्युअल संकट अनेक कोवळ्या जिवांची हानी करीत आहे. या व्हर्च्युअल खेळापायी परदेशात अनेक तरुणांनी जीव दिला आहे. आता हे संकट आपल्यापर्यंतही पोहोचले आहे. मायानगरी मुंबईतील एका विद्यार्थ्याचा या खेळाने बळी घेतला असतानाच मध्य प्रदेशातील इंदूर येथेही असाच प्रकार उघडकीस आला. मात्र सुदैवाने यातील मुलाला वाचविण्यात यश आले आहे.

इंदुर शहरातील एक विद्यार्थी ब्लू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत होता. ‘ब्लू व्हेल’चा अंतिम म्हणजेच ५० वा टप्पा पार करण्यासाठी या विद्यार्थ्याने शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शिक्षकाने या मुलालावेळीच पाहिले व लगेचच रोखले. त्यामुळे त्या मुलाचा जीव वाचू शकला.

चमेली देव शाळेमध्ये हा इयत्ता सातवीमध्ये ‘ब्लू व्हेल चॅलेंज’मधील ५० वा टप्पा पूर्ण करण्यासाठी शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारत होता. उडी मारल्यास 2 कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सतर्क शिक्षकाने त्याचे प्राण वाचविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ अटक होणार नाही- सर्वोच्च न्यायालय

swarit

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची तारीख जाहीर!

News Desk

रशिया-युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मायभूमीत आणण्यासाठी जयंत पाटलांची पंतप्रधानांकडे मागणी

Aprna