HW News Marathi
देश / विदेश

व्यंकय्या नायडुंनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –देशाचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. व्यंकय्या नायडू हे आता मावळते उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांची जागा घेतील. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व केंद्र सरकारमधील मंत्री आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. नायडू यांनी हिंदीमध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात येण्यापूर्वी त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधी तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय,सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांसह मुख्यमंत्र्यांनीही तातडीने राजीनामा द्यावा ! । नारायण राणे

News Desk

पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज – सामना  

News Desk

नासाच्या ‘इनसाईट’ यानची मंगळावर यशस्वी लँडिंग

News Desk