HW News Marathi
महाराष्ट्र

सरसंघचालक मोहन भागवतांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत ?

मुंबई स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांचे नाव दहशतवाद्याच्या यादीत टाकण्याचा प्रयत्न युपीए सरकारने केला होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मोहन भागवत यांना हिंदू दहशतवादी म्हणून अडकवण्याचा तत्कालीन कॉग्रेस सरकारमधील काही नेत्यांनी केला आहे. अशी माहिती एका वृतवाहिनीने वृत प्रकाशीत केला आहे.

अजमेर आणि मालेगाव बॉम्बस्फोटांच्या मागे ‘हिंदु दहशतवाद थिअरी’ असल्याचे यूपीए सरकारने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांना अडकवण्याचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता. यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) बड्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता.मालेगाव, अजमेर आणि इतर ठिकाणी झालेल्या स्फोटांप्रकरणी मोहन भागवत यांची चौकशी करून अधिकाऱ्यांना त्यांना ताब्यात घ्यायचे होते. सर्व अधिकारी यूपीए सरकारच्या आदेशानुसार काम करत होते. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता, असेही इंग्रजी वृतवाहिनीने वृत प्रकाशीत केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘संसदेत बोलू दिलं नसतं तर खासदारकी सोडली असती’– संभाजीराजे आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक

News Desk

आमचं ठरलंय, महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा; चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!

News Desk

“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीच्या रणजित बागलचा पोस्टरद्वारे सवाल!

News Desk
क्राइम

शिवरायां’नी शोधून दिले स्त्रीलंपट आरोपी

News Desk

मुंबई : मायबहिणींच्या अब्रुचे रक्षण करण्याचे व्रत शिवछत्रपतींनी समाधीस्थ झाल्यानंतर तीन – साडेतीनशे वर्षांनंतरही अखंड सुरू ठेवले आहे. मुंबईत तरुणीची छेड काढून पळालेल्या रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्यात शिवछत्रपतींनी पोलिसांना सहकार्य केले आहे.

त्याचे झाले असे की, वांद्रे परिसरात राहणारी १७ वर्षीय तरुणी ज्ञानेश्वर नगर येथे रस्त्यातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या उमेश चव्हाण (२४) आणि सुनील राठोड (१९) यांनी भररस्त्यात तिचा छेड काढला. तरुणीने खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. आरोपी उभे असलेल्या ठिकाणी कुरिअर कंपनीचे ऑफिस असून कंपनीतील दोघांशी ते बोलत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांनी कुरिअर कंपनीतील आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र काहीच हाती लागले नाही. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोघांच्या दुचाकीवरील नंबरप्लेटशेजारी रेडियममध्ये शिवाजी महाराजांचे चित्र स्पष्ट दिसत होते. त्याआधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोहन कदम यांच्या पथकाने एका आरोपीला वांद्रेतून तर दुसऱ्याला वाकोल्यातून शिताफीने अटक केली. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४० जणांची कसून चौकशी केली होती.

Related posts

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या गाडीने पोलिसाला चिरडले

News Desk

त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक

News Desk

वाशिम येथील दरोडेखोर अटक

News Desk