HW News Marathi
Uncategorized

भोकर व बिलोली ग्रामीण रुग्णालयाला शासनाचा “कायाकल्प” पुरस्कार

उत्तम बाबळे

नांदेड : राज्य शासनाकडून उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल दिला जाणारा ‘कायाकल्प’ पुरस्कार यंदा ग्रामीण रुग्णालय भोकर व बिलोली यांनादेण्यात आला. २०१६-२०१७ या वर्षासाठीचा हा पुरस्कार मुंबईत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लक्ष रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी 10 जुलै रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी खासदार अरविंद सावंत, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

‘हा केवळ संस्थेचा नव्हे, तर त्यासाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव आहे. येत्या वर्षी नांदेड जिल्ह्याला अधिकाधिक पारितोषिक मिळतील, यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशा भावना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी व्यक्त केल्या. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी, राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब असून नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांची गुणवत्ता त्यामुळे उंचावली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे म्हणाले, सातत्य व चिकाटी हा गुरुमंत्र अवलंबून आपण प्रथमवर्षीच राज्यस्तरावर १७ व्या स्थानी आहोत.

जिल्हास्तरावर एकूण 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी, सरसम, अर्धापूर, मालेगाव व तुप्पा यांचा समावेश आहे. तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते नुकतेच ग्रामीण रुग्णालय बिलोली व भोकर यांना ISO २००९:२०१५ नामांकनाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही !

News Desk

Sharad Pawar On Harshwardhan Patil | हर्षवर्धनसाठी भरणे थांबणार होते,पण..त्याला भाजपात जायचं होतं..

Arati More

आजम खान यांची जयाप्रदावर अश्लील टीप्पणी, राष्ट्रीय महिला आयोगाने बजावली नोटीस

News Desk