HW News Marathi
क्राइम

पाटोद्यात जुगार खेळणाऱ्या २२ जणांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त      

उत्तम बाबळे

नांदेड – धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा इथं अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या २२ जणांना पोलिसांनी अटक केलीय. अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे ४ लाख ३४ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. याप्रकऱणी धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

विशेष पोलीस पथकास गुप्त माहिती मिळाली पाटोदा गावाजवळील चिकणा शिवारात जुगार अड्डा सुरू आहे. या माहितीवरून पोलिस पथक प्रमुख सहा.पो.नि.ओमकांत चिलोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर,जगताप,वानखेडे,कुलकर्णी,पायनापल्ले, निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते यांनी दि.२५ जून २०१७ रोजी रात्री उशीरा पाटोदा गावाशेजारील चिकना शिवारात भोसले यांच्या शेतात छापा मारला असता एका शेडमध्ये लोकडोबा तुकाराम कुदळे व रामकिशन शंकर जगदंबे हे काही इसमांना घेऊन जुगार आड्यावर झन्ना -मन्ना नावाचा जुगारावर हजारो रुपये लावून खेळत आणि खेळवितांना रंगेहात सापडले.रात्रीचा अंधार व पाऊस चालू असल्याचा फायदा घेऊन पोलीसांना पाहूण पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी जुगारांचा पाटलाग करून २२ जणांच्या मुसक्या आवळल्या.तसेच त्यांच्या जवळील रोख ९७ हजार ५२० रुपये, जुगाराचे साहित्य, २० मोबाईल, ०२ दुचाक्या, ०१ ऑटो रिक्षा, असा एकूण ४ लाख ३४ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत लाकडोबा तुकाराम कुदळे( २८ ),गंगाधर शंकर जगदंबे (२५ ), रामकिशन शंकर जगदंबे (३०),तिघे ही रा.पाटोदा, मल्लेश राजन्ना कोंडावार (२८)रा.कुंडलवाडी, प्रकाश आनंदराव हंबर्डे( ४०) रा.विजयगाव ता.उमरी, बाळजाई मरिबा भंडारे (३९) रा.कारेगाव, संदीप माधवराव गुंडाळे (२८ ) रा.धर्माबाद, पांडुरंग बाबुराव वाघमारे (३०) रा.धानोरा, साईनाथ भोजन्ना सरोडा (२२) रा.आतकूर, आशिष मनोहर सूर्यवंशी (२६ ) रा.धर्माबाद, गोविंद लक्ष्मण मेळगावे (३२ ) रा.पाटोदा, विनायक अशोक साळुंके (२६) रा.चिकना, रहीम खान शेख (२३) रा.चिकना,अवधूत रावसाहेब आवर (२५) रा.चिकना, मारोती गुणाजी कदम (३८) रा.येलापूर,शेख जमलोद्दीन शेख अमिलोद्दीन (२४) सय्यद गौस सय्यद बाबू (२१) दोघे रा.धर्माबाद, केशव श्यामराव कदम (२६), माधव गंगाधर आवारे (३५) दोघे रा.चिकना, लक्ष्मण मुतेन्ना दारमोड (२८) रा.आतकूर, गंगाधर मल्लेश शेटे (३६) रा.सायखेड, सुरेश शंकर निदानकर (२८) रा.बन्नाळी ता.धर्माबाद याना अटक करण्यात आली व सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या सर्वांच्या विरुध्द मुंबई जुगार कायद्यानुसार धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किन्हीराजा मध्ये जऊळका रेल्वे पोलिसांचे “पथसंचलन”

News Desk

आर्यनच्या खान ड्रग्स प्रकरणावर २० ऑक्टोबरला होणार जामीनावर निर्णय

News Desk

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष बेपत्ता प्रकरण, एक जण पोलिसांच्या ताब्यात

swarit