- नागपाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्ह दाखल
मुंबई – स्वतःच्या मुलीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगणाऱ्या इंद्राणी मुखर्जीच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा इंद्राणीसह पाच महिलांवर नागपाडा पोलिसांनी दाखल केलाय.
भायखळा तुरूंगात मंजुळा शेट्ये (35 वर्षे) या महिला कैदीची हत्या झाली होती. याविरोधात तुरुंगातील महिला कैद्यांनी तीव्र आंदोलनं केलं होतं. यामध्ये तुरुंगातील अनेक कर्मचारी जखमी झाले होते. इंद्राणी मुखर्जीनं महिला कैद्यांना हिंसक आंदोलनासाठी प्रवृत्त करून मुलांचा वापर मानवी ढाल म्हणून करण्यास सांगितल्याचा आरोप ठेवण्यात आलायं. भायखळा तुरूंगात महिला कैद्यांना सहा वर्षांच्या मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची परवानगी आहे.
भायखळा तुरूंगाच्या अधीक्षकांनी मंजुळा शेट्येला मारहाण केल्याचा आऱोप आहे. मात्र, तुरुंग अधिकांऱ्यांच्या मते, मंजुळाचा ह्रद्यविकाराच्या झटक्यानं मृत्यु झाला आहे. शवविच्छेदन अहवालात मात्र मंजुळाच्या डोक्यावर अनेक जखमा झाल्या होत्या, शिवाय डोक्यात अंतर्गत जखमाही झाल्या होता. या अहवालानंतर भायखळा तुरुंगाच्या अधीक्षक मनीषा पोखरकर आणि 5 सुरक्षारक्षकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.