HW News Marathi
महाराष्ट्र

वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना “मनसे” इशारा, तुमच्या देशात निघून जा !

मुंबई | “महाराष्ट्र नवनिर्माण सेना (वर्सोवा विधानसभा) वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना “मनसे” इशारा, तुमच्या देशात निघून जा,” असे पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आले आहे. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांन २३ जानेवारीला महामेळाव्यात पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध आक्रमक भूमिक घेतली आहे.

पाकिस्तानी आणि बांग्लदेशीना देशातून बाहेर काढण्याच्या पार्श्वभूमीवर मनसे रविवारी (९ फेब्रुवारी) मोर्चा बोलविण्यात आलेला आहे. यापूर्वी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणी बाग ते आझाद मैदान या मार्गाचा वापर न करण्याची सूचना पोलिसांनी काल (३ फेब्रुवारी) मनसे नेत्यांना केली होती. त्यामुळे गिरगाव चौपाटी, हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिल्याची माहिती मनसे नेते मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. यानंतर मनसेकडून या नव्या मार्गाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे, इथे प्रत्येकाला यायला आवडते त्यामुळे…’

News Desk

आता याचिकाकर्ते मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

News Desk

“…तुमचा वापर होऊ देऊ नका”; संजय राऊतांचा राज्यपालांना सल्ला

News Desk