HW News Marathi
क्राइम

भोकरमध्ये ६७ हजाराची अवैध देशी दारु  जप्त

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकर पासून अवघ्या २ कि.मी.अंतरावरील भोकर – किनवट रस्त्यावरील किन्हाळा शिवारातील एका शेतात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग नांदेडच्या पथकाने २० जून रोजी धाड टाकली व दोघांसह अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठऊन ठेवलेली ६७ हजार रुपयाची देशी दारू जप्त केली आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारु दुकाने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्या पासून सर्वत्र देशी विदेशी दारु अवैध विक्रीचे प्रमाण वाढले असून प्रितीदिन या अवैध विक्री विरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत.याच अनुशंगाने गोपनिय माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पो. उप.नि.सदानंद वाघमारे व त्यांचे सहकारी कर्मचारी जमादार नागोराव पुंडगीर, सुरेश मेहकरकर, चालक सोनाजी कानगुले यांचा समावेश असलेल्या पथकाने दि.२० जून २०१७ रोजी सायंकाळी ७:१५ वाजता भोकर – किनवट रस्त्यावरील किन्हाळा शिवारातील एका शेतातील टिन पत्र्याच्या शेड मध्ये छापा मारला असता तेथे देशी दारु भिंगरीचे २७ बॉक्स ( १८० एम. एल. च्या १२९६ बाटल्या ) मिळाले. ज्याची एकुण किंमत ६७ हजार ३९२ रुपये आहे. यावेळी तेथील नरेश पाटील व शे.अहेमद शे.मिरासाब ,दोघे रा.भोकर यांना ताब्यात घेतले आणि उपरोक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पो.उप.नि.सदानंद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हत्या करून पत्नीला घरातच पुरले

News Desk

जन्मदात्या आईनेच 21 दिवसाच्या मुलीची केली हत्या

News Desk

पोहनकर हत्याकांडाने नागपूर हादरले

News Desk