HW News Marathi
मुंबई

शिवसेनेचा कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा

मुंबई – रामनाथ कोविंद यांची उमेदवारी केवळ दलित मतांसाठी दिली असल्यास त्यात रस नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, भाजपच्या दबावापुढे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी घूमजाव केल्याचं समोर आलंय. कोविंद यांना शिवसेनेनं पाठिंबा दिल्याची घोषणा आज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

भाजपानं राष्ट्रपतिपदासाठी कोविंद यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर षण्मुखानंद येथील शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात कोविंद यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. दलित मतांवर डोळा ठेऊन दलित उमेदवार पुढे केला जात असल्याचं सांगत मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे उद्धव यांनी मेळाव्यात सांगितले होते. त्याप्रमाणे, मंगळवारी सायंकाळी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. त्यात कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. कायम भाजपाला विरोध करावा, अशी काही शिवसेनेची भूमिका नाही. जे पटते, तिथे पाठिंबा देतो आणि जे पटत नाही, तिथे विरोध स्पष्टपणे करतो, असे सांगत ठाकरे यांनी सारवासारव केली. काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष ज्या नावांची चर्चा करत आहेत, त्या फक्त चर्चाच आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यात काहीही अर्थ नाही, तोवर निवडणूक होऊन जाईल, असे ते म्हणाले. रामनाथ कोविंद हे एनडीएने पुढे केलेले चांगले नाव आहे. ते देशासाठी चांगले काम करतील, देशहिताचे निर्णय घेतील, अशी आशा आम्हाला आहे. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

खरं तर देशहितासाठी मोहन भागवत यांच्या नावाला पहिली पसंती दिली होती, ती अजूनही कायम आहे. मात्र, ते राष्ट्रपतिपदाच्या चर्चेत नाहीत, तसेच शेतकऱ्यांचं हित व्हावं, म्हणून स्वामिनाथन यांच्या नावाला दुसरी पसंती दर्शवली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आम्ही स्वामिनाथन यांचे नावही सांगितले होते. मात्र, स्वामिनाथन यांना प्रकृतीच्या कारणास्तव उमेदवारी मिळण शक्य नसल्याचं शहा यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं भाजपनं जे तिसरं नाव जाहीर केले, त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे, असे ठाकरे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर. के. स्टुडिओच्या आगीची ही आहेत खरी कारणे

News Desk

बारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा धिंगाणा, कर्मचाऱ्यांना जबर मारहाण

News Desk

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

News Desk