HW News Marathi
महाराष्ट्र

‘आव्हान-२०१७’ आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी स्वारातीम विद्यापीठाचा संघ कोल्हापूरला रवाना

उत्तम बाबळे

नांदेड – कोल्हापूर येथे ‘आव्हान-२०१७’ या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्याकरीता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे. संघामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे ८० स्वयंसेवक आणि ३२ स्वयंसेविकांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून ०५ कार्यक्रम अधिकारी रवाना झाले आहेत.

संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, प्र. कुलसचिव डॉ. आर. एम. मुलाणी, वित्त व लेखाधिकारी डॉ. जी. बी. कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, डॉ. डी. डी. पवार, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रा. नागेश कांबळे यांच्यासह अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वजीत कदमांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Gauri Tilekar

‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा’, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

बुरमराहच्या ‘नो बॉल’वर जयपूर पोलिसांची फ्री हिट

News Desk