HW News Marathi
महाराष्ट्र

नायगाव येथे विज पडून दोघांचा मृत्यू तर दोनजण जखमी

उत्तम बाबळेनांदेड :- नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात शेतात काम करत असलेल्या शेत मालक व मजूरांवर विज पडली.यात दोन शेत मजूर जागीच ठार झाले असून शेत मालक व अन्य एक मजूर जखमी झाले आहेत.जखमींना नांदेड येथील शासकिय रुग्णालयात अधिक उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात ३ जून २०१७ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास बेमोसमी पावसाने सुरुवात केली.याच दरम्यान नायगाव तालुक्यात दुपारी अचानक वादळी वारा व विजांच्या कडकडाटाने पाऊस सुर झाला.यावेळी माै.कुंटूर ता.नायगाव शिवारातील नागोराव बक्कावाड रा.कुंटूर यांच्या शेतात भूईमुगाचे काढ काडण्याचे काम सुरु होते.या कामावरील तीन मजूर व शेतमालक हे चार जण काड जमा केलेल्या ढिगा-या पासून काही अंतरावर मोकळ्या जागेत बसले असतांना दुपारी ३:४५ वाजताच्या दरम्यान विजेचा कडकडाट झाला व तेथे विज पडली.यात शेतमजूर असलेल्या गंगाधर गोविंदराव म्रुदंगे (२२),शिवाजी गोविंदराव म्रुदंगे (१९) दोघे रा.उखळी माळ ता.नायगाव सख्ख्या भावांच्या अंगावर विज पडल्याने जागीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर शेतमालक नागोराव बक्कावाड (६०) रा.कुंटूर व शेतमजूर तानाजी रघुनाथ पुयड (४५) रा.उखळी माळ ता.नायगाव हे दोघे जखमी झाले आहेत.नायगाव येथील शासकिय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात अाले व अधिक उपचारार्थ त्यांची नांदेड येथे रवानगी करण्यात आली.

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि.विवेकानंद पाटील व पोलीस करिमचारी जमादार बालाजी गीते व पो.काॅ.महाजन यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व रितसर पंचनामा केला आहे.तसेच नायगाव तहसिल कार्यालयाच्या कर्मचा-यांनी देखील घटनास्थळी व शव विच्छेदन स्थळी रुग्णालयात भेट दिल्याचे कळते.जखमींवर नांदेड येथील शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे समजते. तसेच सद्या सर्वत्र खरीप पेरणीपुर्व मशागतीत शेतकरी मशगुल असल्याने बहुतांश जण शेतातच आहेत. तर गंगाधर म्रदुंगे यांचे लग्न काही महिन्यापुर्वीच झाले असून पत्नी ६ महिन्यांची गर्भवती आहे.अशातच झालेल्या या नैसर्गीक आपत्तीने म्रुदुंगे परिवारावर शोककळा पसरली असून शेतकरी वर्गात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने

News Desk

सोनिया गांधींनी ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी! – बाळासाहेब थोरात

Aprna

“….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन”, चंद्रकांत पाटलांचा शब्द

News Desk