HW News Marathi
देश / विदेश

…म्हणून मोदी असतात सतत फ्रेश

नवी दिल्ली – जो माणूस प्रत्येक क्षणी व्यस्त असतो, तो स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी काय करत असेल असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. दररोज अठरा तास काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही थकलेले दिसत नाहीत. ते कायम फ्रेश दिसतात. त्यांच्या या फ्रेश दिसण्यामागचं गुपित त्यांनी स्वतः उघड केलंय.

सोशल मीडियावर एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत त्यांना ट्विटरवर टॅग केलं होतं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल भारत दौ-यावर आले असताना त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवसभरातील कार्यक्रमांची यादी या महिलेने ट्विटरवर टाकली होती. त्यानुसार सकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्यापासून ते एनडीएमधील मित्रपक्षांसोबत डीनर आणि मध्यरात्रीपर्यंत होणारी चर्चा असा एकूण कार्यक्रम होता. या महिलेने मोदींचा हा दिनक्रम ट्विट करत ‘आपण सगळे सतत तणाव असल्याची तक्रार करत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वेळापत्र पहा’, असं म्हटलं होतं. या महिलेने मोदींनाही टॅग केलं होतं.

मोदींनी या ट्विटची दखल घेत, ‘125 कोटी भारतीयांसाठी काम करण तणावपुर्ण नसून समाधानकारक असतं’, अशी प्रतिक्रिया दिली. स्वत: मोदी यांनी 2012 रोजी दिलेल्या मुलाखतीत आपण दिवसेंदिवस कामाच्या व्यसनी जात असल्याचं कबूल केलं होतं. ‘डॉक्टरांनी मला पाच तासांची झोप घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. पण मी जास्तीत जास्त तीन ते चार तास झोपतो. तितक्या वेळातही मला अतिशय शांत झोप लागते’, असं मोदी त्या मुलाखतीत बोलले होते. ‘सकाळी उठल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत माझ्यात तितकीच ऊर्जा असते. योगा आणि प्राणायम यामागचं गुपित असावं. मी रोज न चुकता योगा आणि प्राणायम करतो. जेव्हा कधी मला तणाव जाणवतो मी दिर्घ श्वास घेतो आणि फ्रेश होतो’, असंही मोदी बोलले होते.

इतक्या वर्षांमध्ये काही बदललं असेल तर ते म्हणजे मोदींचं वेळापत्रक. पंतप्रधान झाल्यापासून मोदी व्यस्त झाले आहेत. त्यांच्या या सवयीमुळे इतर मंत्र्यांचीही झोप उडाली आहे. ‘आमचे पंतप्रधान स्वत: झोपत नाहीत, आणि आम्हालाही झोपत नाहीत’, असं वैंकय्या नायडू मिश्किलपणे बोलले होते. मोदींचं स्वतःच्या पक्षातील मंत्री आणि खासदारांच्या कामगिरीवर सतत लक्ष असतं, त्यामुळं मोदींच्या या शिस्तीचा चांगला परिणाम मंत्री आणि खासदारांवरही झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील आयुर्वेदीक डॉक्टर्सही घेणार ‘कोरोना’ उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण

News Desk

“शेतकऱ्यांपर्यंत याबाबत सत्य पोहचलं तर भांडाफोड होईल त्यामुळे…”, मोदींची टीका

News Desk

वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

News Desk