HW News Marathi
महाराष्ट्र

“विदुषकाला पाहायला जशी गर्दी, तशी राज ठाकरेंच्या सभेला गर्दी”, RPI नेत्याची राज ठाकरेंवर टीका

बीड |  सर्कशीत खेळ दाखवणाऱ्या विदुषकाला पाहायला जशी गर्दी असते, तशी राज ठाकरेंच्या सभेला बाहेरून गर्दी होते, अशी टीका औरंगाबादमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. या पार्श्वभूमीवर खरातांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करताना राज ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी सचिन खरात म्हणाले, की राज ठाकरे यांचा पक्ष आता संपलेला आहे. त्यामुळे आता ते हनुमान चालिसा आडून हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे मला एक मला सांगायचंय, की एक सर्कस चाललेली असते, त्यावेळेस सर्कस बघण्यासाठी फार गर्दी असते, त्याचं कारण सर्कसमध्ये विदूषक हा खेळ करत असतो. आणि तो खेळ पाहण्यासाठी गर्दी होते. मात्र, सर्कस संपल्यानंतर त्या तंबूमध्ये कोणीच राहत नाही. उद्या सुद्धा औरंगाबादमध्ये बाहेरून येणारी गर्दी मोठी असणार आहे. मात्र, औरंगाबादची जनता नसणार आहे. कारण औरंगाबाद ही क्रांतिकारी भूमी आहे. पंरतु बाहेरून लोक गर्दी करतील अन लगेच तो तंबू रिकामा होईल. जसे त्यांच्या सभेला गर्दी होते, तसेच मतदान पडत नाही, असे म्हणत आरपीआयचे खरात गटाचे नेते, सचिन खरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबाद सभेवरून जहरी टीका केलीय.

“राज ठाकरे हे बहुजन नेत्यांचा विरोध करतात आणि फक्त विशिष्ट नेत्यांचे नाव घेतात. आजपर्यंत त्यांनी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांचे दर्शन घेतलं नाही. मला एक त्यांना सांगायचं, तुम्ही जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा अपमान करत आहात. उद्याच्या सभेला बाबासाहेबांचे तुलना इतरांसोबत करू नका, अशी विनंती देखील यावेळी खरात यांनी केलीय. दरम्यान शरद पवार आणि राष्ट्रवादीला जातीयवादी म्हणण्यापेक्षा, तुम्ही अगोदर चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन घेतले का ? वडूला जाऊन संभाजी महाराजांचे दर्शन घेतले का ? अहिल्यादेवींचे दर्शन घेतलय का ? असा सवाल करत सचिन खरात यांनी तुम्ही जातीयवादी आहेत की नाही ? हे अगोदर तपासा असा सल्ला देखील दिला,” असे आरपीआय नेते सचिन खरात यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनाशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण!

News Desk

किल्ले शिवनेरीवर तरूणीची आत्महत्या

News Desk

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर तातडीने उच्च न्यायालयाच उद्या सुनावणी होणार

News Desk