HW News Marathi
क्राइम

मनीष भंगाळेला पोलिस कोठडी,

मुंबई। माजी मंत्री एकनाथ खडसे आणि दाऊदचे मोबाइलवरून संभाषण झाल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारा हॅकर मनीष भंगाळे याला शुक्रवारी मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मनीष हा हॅकर आहे की नाही, हे पोलिसांना तपासात सिद्ध होणार आहे.

ज्या नोंदी किंवा कागदपत्रे दाखवून भंगाळे आरोप करत होता, ती बनावट असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुल येथील सायबर पोलिसांनी भंगाळेला ठाण्यातून ताब्यात घेत अटक केली, अशी माहिती सह आयुक्त् (गुन्हे) संजय सक्सेना यांनी दिली. बनावट कागदपत्रांआधारे आरोप करण्यामागील हेतू काय, हे जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी सुरु असल्याचे सक्सेना यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भंगाळेने पाकिस्तान टेलीफोन कंपनीसोबत भारतातील मोबाइल कंपनीची वेबसाइट हॅक करून खडसे आणि दाऊदची पत्नी यांच्यात फोनाफोनी झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेसह राज्य दहशतवाद विरोधी पथकानेही तातडीने चौकशी केली आणि भंगाळेचा दावा चुकीचा ठरवला होता. यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाची सायबर पोलिस ठाण्याकरवी सखोल चौकशी करण्यात आली. भंगाळेने कोणतीही वेब साईट हॅक केल्याचे चौकशीत समोर आलेले नाही. तो मुळात हॅकर आहे का हे आता तपासून पाहिले जाणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बसवर फेकला पेटता गोळा

News Desk

सतरा वर्षानंतर खूनातील आरोपी न्यायालयात हजर

News Desk

उल्हासनगरच्या शिवसेना शहर प्रमुखाला अटक

News Desk