HW News Marathi
महाराष्ट्र

जम्मू काश्मीरमध्ये तणाव, दहशतवादी हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू, 11 जवान जखमी

नवी दिल्ली। जमू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास जवानांवर हल्ला करून दहशत पसरवण्याचा भ्याड प्रयत्न केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलिस ठार तर 11 जवान जखमी झाले आहेत. यात सीआरपीएफचे चार जवान तर पोलिसांचे सात जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशरी चेनानी या बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर हा हल्ला झाला. पंतप्रधान मोदी येणार आहेत म्हणून श्रीनगर बंद ठेवावे, असे आवाहन फुटीरतावाद्यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत

Gauri Tilekar

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे!; वानखेडे प्रकरणावरून सोमय्या संतापले

News Desk

‘बैलगाडा शर्यत घेऊन स्टंटबाजी करतायतं’ पडळकरांवर अजित पवारांचा निशाणा !

News Desk
देश / विदेश

युनिटेकच्या चंद्रांना अटक

News Desk

नवी दिल्ली युनिटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. काही वर्षांपूर्वी ग्रेटर नोएडा येथील घरबांधणी प्रकल्पात युनिटेक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. या खरेदीदारांनी २००६ मध्ये ग्रेटर नोएडामध्ये घरांसाठी पैसे भरले होते. एप्रिल २००८ मध्ये या घरांचा ताबा मिळेल, असे कंपनीतर्फे खरेदीदारांना सांगण्यात आले होते. मात्र, युनिटेक कंपनीला नियोजित वेळेत ग्राहकांना घरे देण्यात अपयश आले होते. गेल्यावर्षी दिल्लीतील न्यायालयाने याप्रकरणी युनिटेकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी जानेवारी २०१६ मध्येही संजय चंद्रा यांच्यासोबत युनिटेकचे अध्यक्ष रमेश चंद्रा, एमडी अजय चंद्रा आणि संचालिका मिनोती बाहरी यांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांना एक दिवस तुरूंगात राहवे लागले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०१६ रोजी या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये ITBP जवानांच्या बसला भीषण अपघात

Aprna

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Aprna

दहशतवाद्यांना जिवंत राहू दिले जाणार नाही

News Desk