HW News Marathi
महाराष्ट्र

मुलांपाठोपाठ वडिलांच्या ही हाती भाजपचा झेंडा

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुलांच्या प्रवेशानंतर आता हो पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अहमदनगरमधील सभेत शुक्रवारी (१२ एप्रिल) पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत. तर बुधवारी (१७ एप्रिल) पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.

राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हातात घेतला. आता ते अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उरले आहेत

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयानंतर विजयसिंह मोहित पाटीलही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु आता विजय सिंह यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निक्की झाली आहे.

Related posts

भारतात मुस्लिम नाही तर हिंदू व्होट बँक आहे अन् राहील, असदुद्दीन ओवैसींचे वक्तव्य

News Desk

“परमबीर सिंग अनेकांशी बोलले असतील, संपर्कात असतील मगच त्यांनी पत्र लिहिलं असावं”, पवारांचं सुचक वक्तव्य

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, कॉंग्रेसचा उपरोधिक टोला   

News Desk