HW News Marathi
महाराष्ट्र

विधानभवनासमोर कांदा फेक आंदोलन

मुंबई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिनानीचेच असलेले कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाद वाढत चालला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी चक्क विधानभवना बाहेर कांदा आणि तुरडाळ फेको आंदोलन करत स्वत: च्याच सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांच्या नाराजीचा सुर हा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधातही होता. यावेळी शेट्टींसह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान हे आंदोलन सरकार विरोधात नव्हते तर शेतकऱ्यांसाठी होते अशी सारवासारव कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वीही अशी आंदोलने केली असल्याचे सांगत त्यांनी स्वताचा बचाव केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे

swarit

मुख्यमंत्र्यांचे हेलीकाॅप्टर अपघातात चार जण जखमी  

News Desk

लोकल कधी सुरू होणार? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न

News Desk