HW News Marathi
राजकारण

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज (६ एप्रिल) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या स्थापना दिवशीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाळ आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत केला काँग्रेस पक्षात प्रेवश केला आहे. “मी जड अत:करणाने भाजप सोडत आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले मनोगत.” काँग्रेस शत्रुघ्न यांना पटना साहिब येथून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यापूर्वी सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधाकंच्या व्यासपीठावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभेचा पत्ता कापण्यात आला आहे. भाजपने पटना साहिब येथून सिन्हा यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा लखनौ लोकसभा जागेवरून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य, भर कार्यक्रमात पंतप्रधानांची हत्या करण्याचे आवाहन

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…सोलापूर मतदारसंघाबाबत

News Desk

जर मोदी जन्मतः ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?

News Desk