HW News Marathi
मुंबई

पानसरे हत्या प्रकरण तपास की मिडीया ट्रायल – सनातन संंस्था

अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

कॉ. गोविंद पानसरे हत्येची दोन वर्षे

मुंबई – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणही झालेला तपास होता की मिडीया ट्रायल होती, असा प्रश्न सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

काँ. गोविंद पानसरे यांची हत्या होऊन 20 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला 16 सप्टेंबर 2015 या दिवशी अटक करण्यात आली, तर याच प्रकरणात दुसरा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना 3 सप्टेंबर 2016 या दिवशी अटक करण्यात आली आहे. समीर यांना अटक होऊन 1 वर्ष 5 महिने होतील, तर डॉ. तावडे यांना या प्रकरणी अटक होऊन सहा महिने होतील. समीर यांच्यावर आरोपपत्र दाखल होऊन वर्ष उलटले तरी या प्रकरणाचा तपास करणारे विशेष पोलीस पथक अद्याप कोणत्याच निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही. या प्रकरणात अद्यापही गुन्ह्यात वारपलेली दुचाकी, अग्नीशस्त्र याबाबी पोलीस शोधून काढू शकलेल्या नाहीत. या प्रकरणात डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे कुटुंबीय वारंवार उच्च न्यायालयात खटला न चालण्यासाठी ‘खो’ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉ. पानसरे यांच्या हत्येपासून एकूणच हा तपास दिशाहीन-भरकलेला, सनातन संस्थेलाच लक्ष्य करून करण्यात आलेला, राजकीय हस्तक्षेपयुक्त असलेला झाल्याने विशेष पोलीस पथकाच्या एकूणच कार्यक्षमता-कार्यशैली यांच्यावर अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतो ! दुर्दैवाने समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनाही साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्याप्रमाणे वर्षानुवर्षे कारागृहातच खितपत पडावे लागणार काय ? असा प्रश्‍न अनेक हिंदुत्ववादी-राष्ट्रप्रेमी यांच्या मनात उत्पन्न होत असल्याचे वर्तक यांचं म्हणणं आहे.

झाला तो तपास होता की मिडीया ट्रायल ?

एकूणच हे प्रकरण पोलिसांनीच ‘हायप्रोफाईल बनवले’ समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर पहिल्या टप्प्यात न्यायालयात उपस्थित करतांना न्यायालयाच्या परिसरातील सर्व रस्ते बंद करणे, टप्प्याटप्यापवर बंदूकधारी पोलीस उपस्थित करणे, समीर यांच्या पुढे-मागे गाड्यांची फौज यातून समीर हे मोठे आतंकवादी आहेत, असेच जनमानसावर भासवण्याचा प्रयत्न केला. समीर यांना अटक केल्यापासून आणि डॉ. तावडे यांना अटक करण्याच्या अगोदर आणि नंतरही एकूणच सर्व वृत्ते पोलिसांकडून जाणीवपूर्वक प्रसिद्धीमाध्यमांकडे इत्यंभूत पोहोचवली जात होती. समीरची जन्मकुंडली आहे आणि त्यात काय आहे, ही माहिती पोलिसांनी दिल्याशिवाय अन्य प्रसिद्धीमाध्यमांना कशी मिळू शकेल ? असा सवाल अभय वर्तक यांनी उपस्थित केला.

तपास करतांना सनातन संस्थेच्या काही महिला साधिकांनाही बोलावण्यात आले होते. मात्र येथेही जाणीवपूर्वक या महिला साधिकांची नावे कशाप्रकारे उघड होतील हेही पोलिसांकडून पाहिले गेले. उद्या समीर यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर ज्या महिला साधिकांची नावे प्रसिद्धीमाध्यमांतून उघड झाली, त्यांची भरपाई कोण देणार ?

संजय साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे डॉ. तावडे यांना अटक झाल्यावर कोणतीही माहिती न्यायालयासमोर येण्याच्या अगोदरच संजय साडविलकर हे दूरचित्रवाहिनीवर विविध चर्चासत्रांमधून झळकू लागले. तपासाच्या संदर्भात अनेक बाबी त्यांनी उघड केल्या. इतकी सगळी कायद्याची पायमल्ली होत असतांना पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाने पोलिसांना ‘आता एकाही वृत्त प्रसिद्ध झाल्यास तुमच्यावर कारवाई होईल’, असे झापल्यानंतर काही प्रमाणात या बाबी बंद झाल्या असल्याचे वर्तक यांनी सांगितले.

पोलिसांचा दिशाहीन तपास

समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने डॉ. तावडे यांना अटक करेपर्यंत कॉ. पानसरे प्रकरणात डॉ. तावडे यांचे नाव कुठेच आले नव्हते. डॉ. तावडे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने जून 2016 मध्ये अटक केल्यावर कोल्हापूर पोलिसांना या हत्येत डॉ. तावडे यांचा हात असल्याचा तर्क लावला. यानंतर प्रत्यक्षात न्यायालयाने डॉ. तावडे यांना ताबा घ्या असे सांगितल्यावरही प्रत्यक्षात डॉ. तावडे यांचा ताबा घेण्यास तीन महिन्यांहून अधिक काळ घेतला. प्रारंभी केवळ समीर यांचे नाव असतांना पुढे पुढे पोलीस सनातन संस्थेच्या समीर यांना अटक केल्यापासून या प्रकरणात पोलीस अद्यापही न्यायालयात कोणताही प्रकारचा ठोस आणि ठोक पुरावा सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे येनकेन प्रकारेण खटला लांबवणे यांसाठीच ते प्रयत्नशील आहेत, अशी शंका घेण्यास वारंवार जागा निर्माण होत असल्याचे वर्तक म्हणाले.

1 जून 2016 ला सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात आणि डॉ. तावडेंच्या खोलीत सीबीआयने धाड टाकल्यानंतरही पुन्हा तिथेच धाड टाकून पोलिसांना काय मिळाले ? तर कसलीतरी औषधे ! म्हणजे पोलिसांना असे वाटत होते की सीबीआयने काही तपासले नाही, किंवा पुन्हा त्याच ठिकाणी काही गुन्हेगारीचे पुरावे मिळतील ? ही तपासाची दिशा योग्य होती का ? असा प्रश्नही वर्तक यांनी उपस्थित केला.

खटला लांबवण्याचा पोलिसांचा डाव !

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांनीही पोलिसांनी न्यायालयात उपस्थित करण्यास नेहमीच विलंब केला. 9 ऑक्टोबर 2015 या दिवशी समीर यांचे ‘ब्रेनमॅपिंग’चे आवेदन फटेाळल्यानंतर खटला लांबवण्याच्या कुटील उद्देशाने समीर यांना दोन मांस न्यायालयातच उपस्थित करण्यात आले नाही. गणेशोत्सव आहे, निवडणुका आहेत, ‘हाय प्रोफाईल कैदी’, अपुरे मनुष्यबळ, अशी वेगवेगळी कारणे देत पोलीस समीर यांची न्यायालयातील उपस्थिती टाळत होते. अखेर एक महिन्यांच्या प्रदीर्घ युक्विादानंतर 21 नोव्हेंबर या दिवशी समीर यांना ‘व्हिडीओ कॉन्फरन्सींग’द्वारे त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली. यानंतर डिसेंबर 2015 पासून समीर यांना परत न्यायालयात उपस्थित करण्यात येऊ लागले.

असाच प्रकार पोलीस आता डॉ. तावडे यांच्या बाबतीत करत आहेत. डॉ. तावडे यांची रवानगी 19 सप्टेंबर 2016 या दिवशी न्यायालयीन कोठडीत झाल्यापासून नंतर झालेल्या एकाही सुनावणीसाठी डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले नाही. यावरून एकूणच पोलिसांना खटला चालवण्यापेक्षा तो लांबेल कसा यातच रस असल्याचे दिसून येत आहे.

अमृत देशमुख यांच्या कार्यक्षमेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करणार्‍या काही बाबी…

अ. 2 सप्टेंबर 2016 या दिवशी कोल्हापूर पोलिसांनी (जे विशेष तपास पथक स्थापन झालेले आहे त्याचे सदस्य आणि अन्य पोलीस) डॉ. तावडे यांचा ताबा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून घेतला आणि रात्री ते त्यांना कोल्हापूर येथे घेऊन आले. तपासाच्या संदर्भात आरोपीचा ताबा घेतल्याची वार्ता खरेतर त्यांनी गुप्त ठेवायला हवी होती; परंतु त्यांची ती फोडली त्यामुळे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर पत्रकारांना ते कळले होते. डॉ. तावडे यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येईल, हे पोलिसांनी पत्रकारांना अगोदरच सांगितल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पत्रकार आणि त्यांच्यासमवेतच्या छायाचित्रकारांची गर्दी होती.

आ. डॉ. तावडे यांना गाडीतून उतरून घेऊन जात असतांना राजारामपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी मुद्दामच डॉ. तावडे यांना पत्रकारांसमोर एखादे बक्षीस दाखवतात तसे नेले आणि पत्रकारांना डॉ. तावडे यांची मनसोक्त छायाचित्रे काढू दिली. ही छायाचित्रे अन्य दैनिकात दुसर्‍या दिवशी प्रसिद्ध झाली आहेत. ज्यात जेमतेम हातभर अंतरावर उभे असणारे छायाचित्रकार चित्रीकरण करत असून अमृत देशमुख त्यांच्यावर काहीही कारवाई करतांना दिसून आली नाही, असा आरोप वर्तक यांनी केला.

डॉ. भारत पाटणकरांनी ‘सनातनचे कोंम्बिंग ऑपरेशन करू’ अशा जाहीर धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे कॉ. पानसरे खून प्रकरण अत्यंत गंभीर आणि समाजभावना दुखावणारे आहे, असे जर सर्वांचे म्हणणे असेल, तर त्या प्रकरणातील आरोपीची कडेकोट सुरक्षा ठेवणे महत्त्वाचे नाही का ? पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यंच्यावर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे अथवा आयजीपी विश्‍वास नांगरे पाटील यांनी कोणतेही कारवाई अद्याप तरी केलेली नाही.

ई. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांचा पार्श्‍व इतिहासही दूषित आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर यांनी पानसरे खून प्रकरणातील अल्पवयीन साक्षीदाराला सुरक्षा देण्याविषयी दिलेले पत्र राजारामपुरी पोलीस स्थानकातून फुटलेले होते. त्याचा मोठाच गाजावाजा झाला होता. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून कोल्हापूर येथे पाठवण्यात आल्याचाही उल्लेख त्यात होता.

उ. २ सप्टेंबरला रात्री पोलीस कोठडीमध्ये पोलीस अधिकारी रवी पाटील आणि अमृत देशमुख यांनी मिळून डॉ. तावडे यांना मारहाण केली. ही मारहाण लपवण्यासाठी तपासाधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी न्यायालयात प्रथम रिमांडच्या वेळी डॉ. तावडे यांना 3 सप्टेंबरला उपस्थित करतांना आदल्या रात्रीच्या वैद्यकीय अहवालाची प्रतच सादर केली नाही. न्यायालयाने ती 2-3 वेळा मागूनही त्यांनी दिली नाही. शेवटी न्यायाधिशांना ते त्यांच्या आदेशात नमुद करावे लागले. यामुळे 2 वैद्यकीय अहवालांमध्ये फरक शोधता आला नाही. शिवाय डॉ. तावडेंना त्यांच्या वकीलांना भेटू न देणे, त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेणे, त्यांना अन्य कैद्यांसोबत डांबून ठेवणे इत्यादी गोष्टींनी पोलीसांचा गैरकारभार ठळक केला.

संजय साडविलकर : वादग्रस्त साक्षीदार

कॉ. पानसरे खून प्रकरणात कोल्हापूर येथील पोलिसांसी संजय साडविलकर या व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली; मात्र संजय साडवीलकर हा व्यक्तीच मुळात वादग्रस्त आणि भ्रष्ट आहे असे म्हटले जाते. त्याच्या संदर्भातील काही बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

अ. कोल्हापूर येथील संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर व पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. साडविलकर यांनी असे गुन्हे केल्याचा न्यायाधिशांसमोर कबुलीजबाब दिला आहे.

आ. संजय साडविलकर यांनी कोल्हापूर येथील चांदीच्या रथाच्या प्रकरणात लक्षावधी रुपयांची चांदी खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

इ. या प्रकरणात सांगली जिल्ह्यात चार आणि कोल्हापूर एक अशा पाच तक्रारी संजय साडविलकर यांच्या विरोधात दाखल झाल्या आहेत; मात्र दुर्दैवाने यातील एकाही तक्रारीच्या विरोधात पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणजे एकाच्या जबाबावरून दुसर्‍यास अटक; मात्र जो स्वत: अवैध गुन्ह्यांची स्वीकृती देतो त्याच्यावर कोणतीच कारवाई नाही, असा दुटप्पीपणा कसा काय ?

याबाबींमुळे संजय साडविलकर हा स्वत:च एक गुन्हेगार असतांना त्याच्या जबाब हा पोलीस ग्राह्य धरतात आणि त्या जबाबाच्या आधारे केवळ संशयावरून डॉ. तावडे यांना अटक करतात, ही बाब आश्‍चर्यकारक नसून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करते.

कॉ. पानसरे कुटुंबियांचा दबाव !

या प्रकरणात तपास करणारे तपास अधिकारी अमृत देशमुख यांची भूमिका प्रारंभीपासून संशयास्पद राहिलेली आहे. पोलीस वेळापत्रकाप्रमाणे त्यांचे रितसर स्थानांतरण झालेले असतांना ‘तपास अधिकारी का पालटला, आता तपास कसा होणार’, अशी आरडाओरड करत कॉ. पानसरे कुटुंबिय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांचे स्थानांतरण रहित करणे भाग पाडले. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे दिसत आहे.

अन्य बाबींवर तपास का नाही ?

पथकर आंदोलनातही कॉ. पानसरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांचे कामगार नेते म्हणून कार्य असल्याने विविध भांडवलदारी लोकांशी त्यांचे वैर असू शकते; मात्र यातील कोणत्याही शक्यतेकडे न पहाता केवळ सनातनला ‘टार्गेट’ करण्याच्या उद्देशाने कॉ. पानसरे कुटुंबीय आकाशपाताळ एक करत आहेत. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांना जर खरेच या हत्येचा तपास करायचा असेल, तर त्यांनी सर्व शक्यतांचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. सनातन संस्थेतील साधकांची चौकशी जेवढ्या खोलवर जाऊन तपास यंत्रणांनी केली, त्या तुलनेत अन्य कोणत्याही शक्यतेचा विचारच झालेला दिसत नाही किंबहुना काही लोक अन्य शक्यतांवरही तपास होऊ नये; म्हणून दबाव टाकत आहेत का, असा संशय सर्व हिंदुत्ववाद्यांच्या मनात येतो, असे वर्तक म्हणाले

सनातन संस्थेला लक्ष करूनच तपास !

कॉ. पानसरे यांची हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवशीपासूनच जाणीवपूर्वक सनातन संस्थेला लक्ष करूनच सर्व यंत्रणा हालण्यास प्रारंभ झाला. वारंवार पुरोगामी, अंनिस, कॉ. पानसरे समर्थक, डॉ. दाभोलकर यांचे समर्थक सनातन संस्थेला गोवण्याच्या दृष्टीने भडक वक्तव्ये करत होते. तपास यंत्रणांपेक्षा यांनाच अधिक कळते, असेच वारंवार वाटत होते. त्यामुळे दुर्दैवाने पोलिसांनी या सर्वांच्या दबावाला बळी पडत सनातन संस्थेच्या साधकांना अटक केली का ? इतपत शंका घेण्यास वाव आहे.

त्यामुळे तपास यंत्रणा आणि त्यांना दिशा देणारे यांच्या कार्यक्षमतेवर याबाबी नेमके तपास यंत्रणा काय करत आहेत, असा प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतात. राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणारे भाजप शासन सध्या सत्तेत असल्याने किमान हिंदुत्ववाद्यांचा मिडीया ट्रायलच्या माध्यमातून होणारा असा छळ थांबावा, अशीच अपेक्षा सामान्य हिंदूंची आहे !

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटच्या अपघात १ जण बुडाल्याची भीती

News Desk

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर लवकरच नव्या टोप्या

News Desk

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

News Desk