गांधीनगर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (३० मार्च) गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहांना पाठिंबा देण्यासाठी हजर राहिले. सभेत संबोधित करताना विरोधकांवर तोफ डागली. आमच्यात आता मतभेद नाहीत, असे सांगत विरोधकांना जोरदार आव्हान दिले. तुमचा नेता कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही कसे एकत्र आलो आहे तसे विरोधकांनी एकत्र येऊन रॅली काढावी, असे आव्हान ठाकरेंनी विरोधकांना दिले. यानंतर ठाकरे आणि शहांची गळाभेट झाली.
‘आज मी इथे आल्याचे पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज माझ्याकडे आणि अमित यांच्याकडे आहे. आमच्यातली भांडणे पाहून काहींना आनंद झाला होता. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन भांडत होतो. पण आता आमच्यातले वाद संपले आहेत. कारण आमचे विचार सारखे आहेत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. आम्हाला खुर्चीची ओढ नाही. २५ वर्षे आम्ही सत्तेशिवाय एकत्र होतो. एक भगवा घेऊन आम्ही २५ वर्षे वाटचाल केली. त्यावेळी सोबतीला कोणीच नव्हते. दिल्लीवर भगवा फडकावण्याचे आमचे स्वप्न होते. ते २५ वर्षांनी पूर्ण झाले,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना-भाजपमध्ये आम्ही एकत्र बसून आमच्यातील मतभेद दूर केले आहेत. पाठीत सुरा खुपसने आमच्या संस्कारात नाही. मी इथे अमित शहांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे आणि मनापासून आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आज गांधीनगर येथे अमित शहा यांच्या सभेत संबोधित करताना म्हटले आहे. यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान दाखल झाले आहेत. यांच्यासह एनडीएतील घटक पक्षांचे इतर नेतेही येथे उपस्थित राहिले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.