HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रसने नोटबंदी विरोधात थाळीनाद आंदोलन

गौतम वाघ

कल्याण – केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी सामान्य नागरिकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरल्याचे सांगत आज कल्याणात जिल्हा काँग्रेसतर्फे थाळीनाद केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचा फटका आजही सर्वसामान्यांना बसत असून त्यामूळे महिलावर्ग सर्वाधिक त्रस्त झाल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी कल्याणच्या शिवाजी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत थाळीनाद आंदोलन केले. तसेच अचानक शिवाजी चौकात ठिय्या मांडून काही काळ मुख्य रस्त्यावरची वाहतूक रोखून धरत रास्तारोकोचाही प्रयत्न केला. मात्र काही मिनिटांतच वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे पाहून पोलिसांनी लगेचच आंदोलकांना बाजूला करीत रस्ता मोकळा करून दिला. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. लोकांचे हक्काचे पैसे असतानाही सरकार मात्र फक्त 2 आणि 4 हजार रुपये देऊन त्यांची कोंडी करीत आहे. हे काळे किंवा चोरीचे पैसे नसून महिला वर्गाला या निर्णयाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. या आंदोलनात सचिन पोटे यांच्यासह महिलाध्यक्ष कांचन कुलकर्णी, संतोष केणे, अमित म्हात्रे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसतर्फेही नोटबंदीच्या निषेधार्थ तहसिलदार कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोहरादेवी विकास आराखड्यातून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडेल

News Desk

शरद पवारांच्या भेटीनंतर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

Manasi Devkar

कदमांनी केलेल्या आरोपानंतर परब अन् सामंतांनी दिल्या प्रतिक्रिया

Aprna