HW News Marathi
महाराष्ट्र

पालघरला 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरू

नागनाथ बाबर

पालघर : 28 वा रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियान 9 जानेवारी ते 23 जानेवारी 2017 या कालावधीमध्ये राज्यामध्ये राबविला जात आहे, त्या दृष्टीने रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ समारंभ आज यशवंतराव चाफेकर वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय, कॉलेज रोड, टेभोंडे, पालघर येथे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते झाला.

9 जानेवारी ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2017 राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याअनुषगांने पालघर जिल्ह्यातही संबंधित विभागानी रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनाकरिता कार्यक्रम राबवून हे अभियान यशस्वी करावे, तसेच अपघात कमी करण्यासाठी तसेच समाजात जागरुकता आणण्यासाठी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यावे वाहन परवाने देताना कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी व्हावी, तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करावी, कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्वांनी कामे करावीत, असे अभिजित बांगर यांचा सांगितले. मोटारवाहन अपघातास आळा घालण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सध्या शासनस्तरावर राबविल्या जात आहेत. त्या अधिकाधिक काटेकोरपणे राबवून अभियान यशस्वी होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रांनी कार्यवाही करावी. सदर तसेच वाहनांना रिफलेक्टर लावणे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी महामार्गावर त्या त्या हद्दीतील रुग्णालय, ॲम्बुलन्स, क्रेन, पोलीस ठाणे, इत्यादीचे दुरध्वनी असलेले फलक लावणे, खडडे, दुरूस्ती करणे, रस्त्यावरील दुभाजक व रंगरगोटीचे काम करून घेणे यासारखी कामे प्राधान्याने करावीत. असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

Manasi Devkar

‘नैना’ क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना चाप बसविण्यासाठी ‘रेरा’ आधी सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य

Aprna

“नाम” संस्थेमार्फत आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवाराला आर्थिक मदत

News Desk