मुंबई | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज (२७ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी उर्मिला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतील. गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिलाच्या काँग्रेस प्रवेशाची मोठी चर्चा होती. आज अखेर उर्मिला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून उर्मिलाला उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे देखील म्हटले जात आहे.
Mumbai Congress Chief @sanjaynirupam attended Felicitation programme organised for the newly appointed office bearers of North East District Congress Committee in Vikhroli. MRCC VP @Charanssapra Dist Presi Preniel Nair, Senior district leaders & party workers were also present. pic.twitter.com/yYr9BukKN9
— Mumbai Congress (@INCMumbai) March 24, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी सोडलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचा अन्य कोणताही नेता निवडणूक लढविण्यास तयार नाही. गेल्या निवडणुकांमध्ये संजय निरुपम या मतदारसंघातून ४ लाख मतांनी हारले होते. याच कारणामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या मतदारसंघासाठी या आधी मराठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा होत होती. या मतदारसंघात भाजपकडून गोपाल शेट्टी यांच्यासारख्या ताकदवान उमेदवार देण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.