HW News Marathi
देश / विदेश

३६ मुले असताना पाळणा हालणार

इस्लामाबाद: हल्लीच्या काळात लोकांकडून कुटुंब लहान असण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जोडप्यांकडून एक किंवा फारफार तर दोन मुलांना जन्म दिला जातो. मात्र, पाकिस्तानातील एका व्यक्तीला ३६ मुलं असूनही त्यांचा वंशविस्तार अजूनही थांबलेला नाही. गुलजार खान असे या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय साठच्या आसपास आहे. गुलजार खान यांनी तीन लग्नं केली आहेत. या तीन पत्नींपासून गुलजार यांना आतापर्यंत ३६ मुलं झाली असून लवकरच त्यांची पत्नी आणखी एका बाळाला जन्म देणार आहे. गुलजार खान यांची पत्नी, मुले आणि नातवंडे असा मिळून १५० जणांचा परिवार आहे. इस्लामाबादमध्ये राहणा?्या गुलजार खान यांना या गोष्टीचा मोठा अभिमान वाटतो.

आश्चयार्ची बाब म्हणजे त्यांचा भाऊ मस्तान यांनाही तीन पत्नी असून एकूण २२ मुले आहेत. याबाबत मस्तान यांना विचारले असता ते म्हणतात, माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. तो जन्माला येणा?्या प्रत्येकाला अन्न देईल, अशी माझी श्रद्धा आहे. कुटुंबाचा पसारा वाढल्यामुळे होणा?्या दुष्परिणामांची त्यांना अजिबात चिंता नाही. पाकिस्तान लोकसंख्येच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकांचा देश आहे.

माज्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी मित्रमंडळींची आवश्यकता भासणार नाही, असेही गुलजार सांगतात. ते म्हणतात, ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली आहे. त्यांचा जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया असताना ती रोखणारे आपण कोण?, असा सवाल ते विचारतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोटबंदीनंतर देखील निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर !

News Desk

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान ‘या’साठी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Aprna

काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

News Desk