HW News Marathi
देश / विदेश

पोलिसांची जागा घेणार कुत्रे

बँकॉक – रस्त्यांवर फिरणा-या भटक्या कुत्र्यांमुळे माणसांना अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतो. केवळ भारतातच भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, असे नाहीये तर जगभरात भटक्या प्राण्यांमुळे त्रास होतो. याच त्रासाला थायलंडचे नागरिक अनेक वर्षांपासून वैतागले आहेत. मात्र, आता या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.

थायलंडच्या चेल लिमिटेड नावाच्या एका अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनीने कुत्र्यांसाठी एका अत्याधुनिक जॅकेटची निमीर्ती केली आहे. हे जॅकेट भटक्या कुत्र्यांना घालून त्यांना सुरक्षारक्षक किंवा पहारेकरी बनवणे शक्य होणार आहे. अशा कुत्र्यांना कोणतेही ट्रेनिंग न देता त्यांना पहारेकरी बनवता येणार आहे. कारण या जॅकेटमध्ये एक व्हिडीओ कॅमेरा बसवण्यात आला आहे. सेन्सर असल्याने कुत्र्याने भुंकायला सुरूवात केली की जॅकेटमधला कॅमेरा आपोआप सुरू होईल आणि त्याचे रिअल टाइम रेकॉर्डिंग घरबसल्या कंम्प्यूटर किंवा मोबाइलवरून पाहता येणार आहे.

केवळ वासाच्या आधारे गुन्हेगाराला ओळखण्याची भन्नाट क्षमता कुत्र्यांमध्ये असते. त्यामुळे या नव्या जॅकेटचा फायदा पोलिसांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण गुन्हेगारांना ओळखून त्यांना तुरूंगात टाकण्याचं त्यांचं काम अगदी सोपं होणार आहे. याशिवाय शहरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोशल मीडियावर कमांडर अभिनंदन यांच्या लूकची जोरदार चर्चा

News Desk

पाकिस्तानी बहीण बांधणार मोदींना राखी!

News Desk

सलग नवव्या दिवशी पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar
राजकारण

आज भाजपचे उपोषण

News Desk

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशभरात भाजपचे नेते उपोषणाला बसले आहेत. दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी देखील या एकदिवसीय उपोषणात सहभागी झालेले आहेत. कॉंग्रेसच्या उपोषणाचा फज्जा उडाल्यानंतर भाजपचे उपोषण यशस्वी होणार का ? याकडे सध्या जनतेचे लक्ष लागलेले आहे.

विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन वाया गेल्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपने एकदिवसीय देशव्यापी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

सध्याच्या उपोषणाच्या राजकारणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील व्यथित झाले आहेत. आजच्या उपोषणात भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार आज दिवसभर उपोषण करणार आहेत. पंतप्रधान दैनंदिन कामात व्यस्त असूनही ते आज उपवास करणार आहेत.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत भांडून (पश्चिम) रेल्वे स्टेशन परिसरात ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसलेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १२ वाजल्यापासून विलेपार्ले येथे उपोषणाला बसले आहेत.

 

 

 

 

Related posts

महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली !

News Desk

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास विभागाचा घेतला आढावा

Aprna

कर्जमाफीसाठीही शेतकऱ्याला ‘अटी व शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ नावाखाली रडवले गेले !

News Desk