HW News Marathi
राजकारण

माढाचा तिढा अखेर सुटला, राष्ट्रवादीकडून संजय शिंदे निवडणूक लढविणार

मुंबई | बहुचर्चित अशा माढा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून माढा मतदारसंघात संजय शिंदे निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. शरद पवार हे माढ्यातील पदाधिकाऱ्यांची आज (२२ मार्च) दुपारी ४ वाजता बैठक घेतील. या बैठकीनंतर माढा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. संजय शिंदे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. खरंतर, शरद पवार हेच माढा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, एकाच कुटुंबातील इतके जण नको, असे म्हणत शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली.

माढा मतदार संघातून सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव चर्चेत होते. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील माढ्यातून तिकीट न मिळाल्यामुळे विजयसिंह यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk

“…सत्तेशिवाय समोरासमोर या”, संजय राऊतांचे शिंदे गटाला आव्हान

Aprna

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

Aprna