HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार ?

मुंबई | माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली आहे. एकाच कुटुंबातल्या किती लोकांनी निवडणूक लढवावी असे सांगून पवारांनी माढातून माघार घेतली असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलातना खुद्द पवारांनी सागंतिले आहे. पुढे पवार असे देखील म्हणाल की, पार्थ पवारने लोकसभा निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा असलल्याचे पवारांनी यावेळी सांगितले आहे.

पावरांनी माढातून माघार घेतली असली तरी या मतदारसंघा नक्की कोण निवडणूक लढविणार आता सर्वांचे लक्ष लागेल आहे. पार्थ हे मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे.  पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये आज (११ मार्च) राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराशी संवाद सांधताना पवारांनी ही माहिती दिली आहे.

तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला पवार यांनी बगल देऊन प्रदेशाध्यक्ष त्याबाबत निर्णय घेतील असे सांगितले.  माढ्यातून शरद पवार यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर चर्चा रंगली होती. विजयसिंह मोहिते-पाटलांना डावलल्यामुळे माढा लोकसभेतल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात माढ्याबाबत पुनर्विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

Related posts

 देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार पराक्रम गाजवत आहेत !

News Desk

शिवसेनेचे विचार प्रतिगामी, नवाब मलिकांची शिवसेनेवर टिका

News Desk

काश्मीरमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांची घरात घुसून दहशतवाद्यांनी केली हत्या

News Desk