HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : राजू शेट्टी आघाडीसोबत राहणार

नाशिक । स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडल्याचे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली. आता राजू शेट्टी यांनी आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

छगन भुजबळ यांनी नाशिक राजू शेट्टी यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने आपली पहिली मतदार यादी जाहीर करताना हातकणंगले मतदारसंघ आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडत असल्याचे स्पष्ट केले. आता काँग्रेस देखील वर्धा किंवा सांगली पैकी एक जागा स्वाभिमानीला देणार आहे, अशीही माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकांपूर्वी झालेल्या या चौकीदारांच्या चौक्या आम्ही बंद करू !

News Desk

तुम्ही ‘त्यांच्या’ सगळ्या आचरट, बालिश चाळयांना पाठिशी घातले !

News Desk

अग्निशमन केंद्राच्या जागेवर सहकारमंत्र्यांचा बंगला

News Desk