HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंकडून खंडणी मागितल्या प्रकरणी रेणू शर्मांना अटक

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेने त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याची पोलिसांत तक्रार दिली होती. धनंजय मुंडेंनी मुंबईच्या मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये एका परिचित महिलेने पाच कोटी रुपये किमतीचे दुकानाची मागणी केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा नावाच्या महिलेला अटक केले आहे. 

धनंजय मुंडे म्हणले, “गेली दीड ते दोन वर्षांपासून हा त्रास सहन करत आहे. रेणू शर्मांनी माझ्याविरोधात खोटी तक्रार केली. ती तक्रार नंतर मागे घेतली. काही दिवसांपासून जो त्रास होता तो मी सहन करत होतो. शेवटी सहनशक्ती संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार दिली. आता पुढे जे काही करायचे आहे ते पोलीस करतील मी पोलिसांनी सर्व माहिती पुरविली आहे,” अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.  

नेमके काय आहे प्रकरण

या महिलेने फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून पाच कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. यापूर्वी महिलेने ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईलची मागणी केली होती. धनंजय मुंडेंनी या महिलेला कुरियरद्वारे हे पाठवल्याची माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. यानंतर त्या महिलेने पाच कोटी रुपये किमतीचे दुकानाची मागणी  करत तगादा लावला होता. आणि पैसे न दिल्यास बलात्कार केल्याचा आरोप करत बदनामी करण्याची धमकी दिल्याची माहिती धनंजय मुंडेंनी पोलिसांना सांगितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुणरत्न सदावर्ते गिरगाव न्यायालयात हजर, ताब्यासंदर्भात सुनावणी सुरू

Aprna

महाविकासआघाडी सरकार मराठा आरक्षण मिळवून देईल ,जबाबदारी घ्यायला तयार ! मुश्रीफांचं मोठ विधान

News Desk

लखीमपूर खेरीप्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Aprna