HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis यांच्या बालेकिल्ल्यात Sanjay Raut यांचा दौरा

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत नागपूर दौऱ्यावर असून महानगरपालिकेच्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत असंही संजय राऊत म्हणाले आहेत. नागपुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेही शासकीय कामासाठी येणार असून त्यावेळी तेदेखील पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील अशी माहिती दिली. “जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत. नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी शिवसेनेची ताकद येथे चांगली होती. आमच्यासारखे नेते येतात तेव्हा लोक जमतात, अनेक मान्यवर येतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू. आदित्य ठाकरेही शासकीय कामासाठी जाणार असून त्यावेळी तेदेखील पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

#DevendraFadnavis #SanjayRaut #KiritSomaiya #Nagpur #INSVikrant #ST #GunaratnaSadavrte #UddhavThackeray #AdityaThackeray #AnilParab #BJP #ShivSena #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosale यांना न्यायालयाचा मोठा धक्का!

News Desk

माझ्या मुलांनी प्रत्युत्तर दिल्यावर दिसून येतं का? इतर वेळेस दिसत नाही?

News Desk

Ajit Pawar यांना घेऊन सरकार बनवलं ते…Sanjay Raut BJP वर भडकले !

News Desk