नवी दिल्ली | भारताचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उद्या (१मार्च) भारतात परतणार आहे. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. “शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या (१ मार्च) सुटका करणार आहोत,” असे इम्रान यांनी पाकिस्तानच्या संसदेत म्हणाले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर आज (२८ फेब्रुवारी) सैन्य दल, वायुसेना आणि नौदल या तिन्ही दलाची संयुक्त पत्रकार परिषद सायंकाळी ७ वाजता दिल्लीत होणार आहे. या पत्रकार परिषदेकडे दोन्ही देशाचे लक्ष लागले आहे.
Joint press briefing by Army, Navy and Air Force in New Delhi that was scheduled for 5 pm today has been postponed to 7 pm. pic.twitter.com/BFdtdWeikU
— ANI (@ANI) February 28, 2019
या तिन्ही दलाची पत्रकार परिषद आधी सायंकाळी ५ वाजता होणार होती. पाकिस्तान विंग कमांडर अभिनंदनला सोडणार असल्याची माहिती मिळाताच या पत्रकार परिषदेच्या वेळेत बदल करून सायंकाळी ७ वाजताची करण्यात आली. तिन्ही दलाचे प्रमुख या पत्रकार परिषदेत नेमके काय बोलणार यांची उत्सुकता सर्वांच लागली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.