HW News Marathi
महाराष्ट्र

रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सामील झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांवर नितेश राणेंची टीका

मुंबई | भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर ट्वीट आणि व्हिडिओद्वारे टीका केली आहे. नितेश राणेंनी संजय पांडेंच्या इफ्तार पार्टी सहभागी झाल्याचा फोटो ट्वीट करत केला असून ज्या रझा अकादमीने’आझाद मैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले. अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करण्याच काम महाविकास आघाडी करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

नितेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “ज्या ‘रझा अकादमीने’आझादमैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?, असे ट्वीट केले असून यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत पेजला टॅग केले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत उपस्थित होते. देशभरात रझा अकादमीविरोधात भूमिका घेतली आहे. रझा अकादमीला प्रोत्साहन देणे हे महाविकासआघाडीचे धोरण आहे का?, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विधिमंडळात म्हणतात, रझा अकादमीवर बंदी घालण्याचा आमचा विचार आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्य सरकारचे अधिकारी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहतात. या अकादमीच्या पार्टीत सहभागी होणे हा अधिकार महाविकासघाडी सरकारने तर दिला नाही ना?, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस म्हणतात, “मुख्यमंत्री महोदय तुमच्या मंत्र्यांना आवरा”

News Desk

कृषीराज्यमंत्र्यांच्या अंगावरच फवारले औषध

News Desk

परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार ? मुंबई पोलीस आयुक्त बदलणार?

News Desk