HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार ? मुंबई पोलीस आयुक्त बदलणार?

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. याच प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाकडून १० दिवसांची म्हणजेच २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, त्यातच आता NIAच्या तपासात मुंबई पोलिसांनी स्फोटक प्रकरणात अनेक चुका केल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका आता मुंबई पोलीस आयुक्तांना बसण्याची शक्यता आहे. आज (१६ मार्च) मुख्यमंत्र्यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी महाविकासाआघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली असून या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाली आहे. या चर्चेत मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याची देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर नव्या मुंबई पोलिस आयुक्तांसाठी काही नावे देखील चर्चेत असल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मुंबई पोलीस आयुक्तांसाठी रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, बी.के. उपाध्याय, डॉ. के. वेंकटेशम या वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपला दे धक्का!

News Desk

पूर्वीच्या सरकारने विदर्भाची उपेक्षाच केली !

News Desk

खेडेकर हे काय तुमचे जावई आहेत का? कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

Aprna