HW News Marathi
राजकारण

आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी !

पुणे | भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या युतीचे आरपीआयतर्फे स्वागतच आहे. परंतु आरपीआयला एकही जागा न दिल्यामुळे देशभरातील आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी आज (२४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

सनेने मोठे मन करून दक्षिण मुंबईतील जागा रिपब्लिकन पक्ष्याला सोडावी. त्या मतदार संघात माझा समाज मोठ्या संख्येने आहे. इतर सर्व मतदार संघातून त्यांना आमचा फायदा होईल. मी माणूस सरळ आहे, पण माझ्याशी कुणी वाकड वागले तर मी सुद्धा वाकडा आहे. सेना भाजप युतीच्या पत्रकार परिषदेत आम्हाला बोलावले पाहिजे होत. आठवले म्‍हणाले की, ‘‘शिवसेना सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना वृत्तपत्रातून टीका करते, नेहमी त्यांच्या विरोधात भूमिका घेते असतानाही तुम्ही त्यांना एक जागा वाढवून देता आणि आमच्याकडे मात्र दुर्लक्ष करता. हे योग्य नाही, आम्हाला कुणालाही अडचणीत आणायचे प्रयत्न करून नये, परंतु, एकतरी जागा आम्हाला देण्यात यावी, रिपब्लिकन पक्षाला बाजूला करणे योग्य नाही. आमच्या जागा किती निवडून येतात यापेक्षा आम्ही किती जागा निवडून आणतो त्याला महत्व आहे. आम्हाला कुणी दूर करण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला सत्तेतून दूर करण्याची ताकत आमच्यात आहे.’’ यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव ,हनुमंत साठे ,शहराध्यक्ष अशोक कांबळे आदी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही”, नितेश राणेंची टीका

Aprna

महाराष्ट्रात आलेले पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते !

News Desk

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk