HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रताप, शहीदांच्या श्रद्धांजली सभेत नेत्यावर उधळले पैसे

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांना देशभरात श्रद्धांजली, आदरांजली वाहण्यात येत आहे. उत्तराखंडमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी एक श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. मात्र, या श्रद्धांजली सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे चिरंजीव वीरेंद्र रावत यांच्यावर पैसे उधळल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

उत्तराखंड काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या प्रतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या श्रद्धांजली सभेत स्टेजवर संगीत सादर करणारे कलाकार आणि त्याच्या समोरच वीरेंद्र रावत उभे होते. यावेळी एका तरुणाने येऊन त्यांच्यावर पैसे उधळले. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार हसत खेळत चालू होता. थोड्या वेळाने ते पुन्हा पुढे आले आणि पुन्हा त्यांच्यावर पैसे उधळले गेले. शहीद जवानांच्या श्रद्धांजली सभेत हा संतापजनक प्रकार घडत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याविरोधात पुकारले बंड

News Desk

आझम खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल

News Desk

यंदा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार | हवामान विभाग

News Desk