HW News Marathi
राजकारण

किर्ती आझाद यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

नवी दिल्ली | भाजपमधील निलंबित खासदार आणि क्रिकेटर किर्ती आझाद यांनी आज (१८ फेब्रुवारी) काँग्रेसमध्ये जाहीररित्या प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आझाद यांनी प्रवेश केला आहे. आझाद हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत प्रवेशाची तारीख जाहीर केली होती. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रवेश पुढे ढकलला होता. आझाद यांनी ट्वीट करून काँग्रेस प्रवेशाची माहिती दिली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या वेळीस राहुल यांनी मिथिला स्टाईलमध्ये माझा सन्मान करून माझा पक्षात स्वागत केले असल्याचे ट्वीट आझाद यांनी केले आहे.

आझाद हे बिहारमधील दरभंगा येथून खासदार आहेत. पक्षविरोधी वक्तव्यांमुळे भाजपने त्यांची २०१५ मध्ये पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर आझाद यांनी बिहारमधील संयुक्त जनता दल-भाजप युती सरकारवरही हल्ला चढवला होता. गेल्या काही दिवसांपासून आझाद यांच्या काँग्रेसवासी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.कीर्ती आझाद हे आपल्या वादग्रस्त विधानमुळे नेहमीच चर्चेत राहतात. क्रिकेटच्या मैदानातून ते राजकारणाच्या मैदानात दाखल झाले होते. माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पुत्र असल्याने त्यांचे काँग्रेसशी जुने संबंध आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरतेय”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aprna

नायर हॉस्पिटलसमोर डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबियांकडून निदर्शने

News Desk

राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का; मलिक-देशमुखांचा मतदानाचा अर्ज फेटाळला

Aprna