HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : भारताकडून पाकिस्तानच्या २०० हून अधिक वेबसाईट्स हॅक

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामात १४ फेब्रुवारीला भारतीय जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हॅकर्सकडून आता पाकिस्तानच्या जवळपास २०० हून अधिक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. टीम आय-क्रूने पाकिस्तानच्या या वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. “पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली. आम्ही १४/०२/२०१९ चा हल्ला कधीही विसरणार नाही”, असा मजकूर या वेबसाईटवर लिहिण्यात आला आहे. पाकिस्तामधील सायबर क्षेत्रातील हा सर्वात मोठा हल्ला आहे.

“पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली. आम्ही १४/०२/२०१९ चा हल्ला विसरणार नाही. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. आम्हाला माफ करा ?, आम्ही विसरून जाऊ ?, भारत हा हल्ला कधीही विसरणार नाही”, असा इशारा देखील येथे देण्यात आला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही वेबसाइट हॅक करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे भाजपची नाव न घेता तक्रार

News Desk

अमेरिकेत अग्नितांडव, सात हजार हेक्टरवरील जंगल खाक

News Desk

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या स्वप्नांना वेगळ्या उंचीवर नेणार !

swarit