HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : संयुक्त राष्ट्राकडून दहशतवादी जाहीर केलेल्या संघटनांची खाती ब्लॉक करा !

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला कडक सूचना दिल्या आहेत. ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळा’कडून दहशतवादी जाहीर केलेल्या संघटनांची खाती ताबडतोब ब्लॉक करा, असा निर्देश अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे.

जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक कारवाईला अमेरिकेकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाकडून २००१ साली जैश ए मोहम्मद या संघटनेला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. २००२ मध्ये जैश-ए-मोहम्मद या संघटनेविरोधात बंदी घालण्यात आली होती. परंतु, अजूनही ही संघटना कार्यरत आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ क्रमांकाच्या निर्बंध यादीत असलेल्या दहशतवादी संघटनांची खाती ब्लॉक करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | अशी असतात भारतीय सैन्याची साहसी प्रात्यक्षिके

News Desk

पेट्रोलचे दर गगणाला भिडल्याने सर्वसामान्याचे खिशे रिकामे

swarit

ठरलं! आज संध्याकाळी मोदी सरकारचा विस्तार, ४ मंत्र्यांचे राजीनामे, ४३ नेते मंत्री म्हणून शपथ घेणार!

News Desk