HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ फिल्मसिटी बंद

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव फिल्मसिटी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत फिल्मसिटी बंद राहणार आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात प्रचंड संतापाची भावना आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याने ‘पाकिस्तानला धडा शिकविण्यात यावा’ अशी मागणी लोकांकडून होत आहे. जगभरातून, देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातून या हल्ल्याच्या तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बसला अपघात, आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू

News Desk

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Aprna

दाऊदची संपत्ती जप्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk