नवी दिल्ली | सीबीआयचे अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अनोखी शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी न्यायालायने आज (१२ फेब्रुवारी) राव यांना १ लाख रुपये दंड आणि न्यायालयाचे दिवसभर कामकाज होईपर्यंत थांबण्याची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनवालेल्या शिक्षेमुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जाते.
Chief Justice of India Ranjan Gogoi says 'for contempt of court we impose a fine of Rs 1 lakh and direct him(former CBI interim director M Nageshwar Rao) to sit in one corner of the court till the court rises for the day' #MuzaffarpurShelterHome https://t.co/Xzr7kcBYd8
— ANI (@ANI) February 12, 2019
आलोक वर्मा आणि राकेश वर्मा या सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमधील वाद समोर आल्यानंतर मोदी सरकारने राव यांची सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर मुझफ्फरपूर निवारागृह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची बदली सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय केली जाऊ नये, अशा सूचना राव यांना देण्यात आल्या होत्या. तरी देखील राव यांनी तपास पथकाचे प्रमुख असलेल्या ए. के. शर्मा यांची १७ जानेवारीला सीआरपीएफमध्ये बदली केली. यानंतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी काल राव यांनी बिनशर्त माफी मागितली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.