HW News Marathi
राजकारण

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या अपयशी होण्यामागे एक महिला | शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली | “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या अपयशी होण्यामागे एक महिला असते” , असे वक्तव्य अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. “मीटू आंदोलनाची खिल्ली उडविण्याकरिता मी हे विधान करत नाही. प्रत्येकाने माझ्या या विधानाचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. अनेक यशस्वी पुरुषांना बदनाम करण्यामागे महिलांचा हात होता, हे मी स्वतः पहिले आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. अनेक करामती करूनही माझे नाव कोणीही मीटू आंदोलनात घेतले नाही”,असेही शत्रुघ्न सिन्हा यावेळी म्हणाले.

लेखक ध्रुव सोमाणी यांच्या ‘ए टच ऑफ एव्हिल’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी मिटू मोहिमेवर भाष्य केले. “माझी पत्नी पूनम माझ्यासाठी एखाद्या देवीप्रमाणे आहे. तिच माझे सर्वस्व आहे. अनेक करामती करूनही माझे नाव कोणीही मीटू मोहिमेत आले नाही. माझ्याबद्दल आता जरी कोणाला काही बोलायचे असेल, तरी कृपया आता बोलू नका”, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. “माझी पत्नी मला जे काही सांगते ते मी ऐकतो, तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. जेणेकरून सर्वांना हे जाणवावे की मी विवाहित आहे आणि माझे कौटुंबिक जीवन सुरळीत सुरु आहे”, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना महाराष्ट्र पोलिसांनाकडून अटक

News Desk

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही; छगन भुजबळ यांच्यासह ‘मविआ’चा सभात्याग

Aprna

१० ॲागस्टपर्यंत देशात कोरोनाचे २० लाखांपेक्षा जास्त रूग्ण होतील,राहुल गांधीचा सरकारला इशारा !

Arati More